VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 6 April 2022

VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 6 April 2022

| Updated on: Apr 06, 2022 | 2:43 PM

मी पक्षाची नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली आहे. मी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी मला सांगू नये, असे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्याशी माझे बोलणे झालेले नाही. त्यांनी बोलावले तर मी माझी भूमिका त्यांना समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचे आहे, असेही ते म्हणाले.

मी पक्षाची नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली आहे. मी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी मला सांगू नये, असे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्याशी माझे बोलणे झालेले नाही. त्यांनी बोलावले तर मी माझी भूमिका त्यांना समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचे आहे, असेही ते म्हणाले. टीका करणाऱ्यांनाही त्यांनी सुनावले आहे. ते म्हणाले, एवढेच होते, तर राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पिकर लावले? जे बोलतायेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे, वसंत मोरेला पक्ष भूमिकेबद्दल शिकवू नये, असे वसंत मोरे म्हणाले आहेत. प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी भोंग्यावर मत मांडताना वसंत मोरेंची भूमिका पक्षाची भूमिका नाही, असे म्हटले होते.