Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 16 August 2021
अमेरिकेनं त्यांचं सैन्य आणि नाटोच्या सैन्यानं अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. तालिबानानं रविवारी जलालाबाद आणि काबूल शहरावर ताबा मिळवला.
अमेरिकेनं त्यांचं सैन्य आणि नाटोच्या सैन्यानं अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. तालिबानानं रविवारी जलालाबाद आणि काबूल शहरावर ताबा मिळवला. दरम्यानच्या काळात राष्ट्रपती अशरफ गनी त्यांच्या मंत्रिमंडळासह तझाकिस्तानला पळून गेले आहेत. तालिबानाच्या सत्तेत राहण्याची मानसिकता नसलेले नागरिक मिळेल त्या मार्गानं देश सोडताना दिसत आहेत. विमानतळांवर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं समोर येणाऱ्या दृश्यांमध्ये दिसत आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांची धडपड व्हिडीओमधून स्पष्ट दिसतेय.
Latest Videos