Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 8 August 2021
राज्यात भाजपची साथ सोडून शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर केंद्रातील सत्तेतूनही सेना बाहेर पडली. इतकंच नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधूनही बाहेर पडली.
राज्यात भाजपची साथ सोडून शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर केंद्रातील सत्तेतूनही सेना बाहेर पडली. इतकंच नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधूनही बाहेर पडली. या घडामोडीनंतर आता शिवसेनेची काँग्रेससोबत जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली. तसंच राहुल गांधी यांनी शिवसेनेची जडणघडण आणि कार्यपद्धतीबाबत जाणून घेतल्याचंही संजय राऊत म्हणाले होते. याबाबत विचारलं असता उद्या शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएमध्ये सहभागी झाली तर आश्चर्य वाटणार नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. पाटील यांनी आज राजधानी दिल्लीत नारायण राणे, भागवत कराड, कपील पाटील आणि भारती पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.