VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 17 October 2021

VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 17 October 2021

| Updated on: Oct 17, 2021 | 1:52 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते आज सिल्वासामध्ये बोलत होते. ‘काल मी पाहिले महाराष्ट्र भाजपचे एक नेते शरद पवारांचा उल्लेख अरे-तुरे, एकेरी भाषेत करीत होते ही राज्याची परंपरा नाही आम्ही मोदी साहेबांचा उल्लेख किंवा अमित शाह यांच्याविषयी कधी असे बोलत नाही.