VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1.30 PM | 8 July 2021
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा होता.
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा होता. मोदीच सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी चढवला आहे.
इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने 10 दिवस आंदोलनाचा धडाका सुरू केला आहे. आज नागपूरमध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना नाना पटोले यांनी ही टीका केली. मोदींच्या मंत्री मंडळातून चांगल्या मंत्र्यांना, काम करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन देण्यात आलं आहे. संजय धोत्रे हे चांगलं काम करत होते, असं पटोले म्हणाले.
Latest Videos