VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 10 October 2021
मुंबईतल्या रस्त्यांच्या दुर्देशेवरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा’, अशा शब्दात त्यांनी महापौरांवर निशाणा साधला आहे.
मुंबईतल्या रस्त्यांच्या दुर्देशेवरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा’, अशा शब्दात त्यांनी महापौरांवर निशाणा साधला आहे. “गेल्या तीस वर्षांपासून मुंबईकरानी शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगर पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती, परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय ‘एखादा पेग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा’.
Latest Videos