VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 19 October 2021
पत्नीशी भांडण झाल्यानंतर स्वतःचं घर जाळताना आजूबाजूची दहा घरंही जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेत सुमारे पन्नास लाख रुपयाहून अधिक किमतीचे नुकसान झाले आहे.
पत्नीशी भांडण झाल्यानंतर स्वतःचं घर जाळताना आजूबाजूची दहा घरंही जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेत सुमारे पन्नास लाख रुपयाहून अधिक किमतीचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे. पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे सुरु होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला. नंतर या आगीने रौद्ररुप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला.
Latest Videos