लोकसभेच्या उमेदवारीच्या घोषणेपूर्वीच बंडखोरीची भिती? कुठं बंडखोरी होण्याची शक्यता?
महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून जागावाटप आणि उमेदवारी जाहीर व्हायची आहे. येत्या दोन तीन दिवसात जागा वाटप होईलच, पण काही ठिकाणच्या मतदारसंघात बंडखोरीची भिती.... कोणत्या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता बघा?
मुंबई, १० मार्च २०२४ : महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून जागावाटप आणि उमेदवारी जाहीर व्हायची आहे. येत्या दोन तीन दिवसात जागा वाटप होईलच, पण काही ठिकाणच्या मतदारसंघात बंडखोरीची भिती आतापासूनच निर्माण झाली आहे. बंडखोरीचं पहिलं ठिकाण म्हणजे आमरावती लोकसभा… अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या भाजपकडून लढू शकतात, त्यांनी स्वतः यासंदर्भातील संकेत दिलेत. मात्र ही जागा अडसूळ पिता-पुत्रांपैकी एक जण लढण्याची शक्यता आहे. दुसरी जागा शिरूरची… याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे अमोल कोल्हे यांच्याविरोधात लढण्यास इच्छूक आहेत. अहमदनगरमध्ये भाजपची जागा आहेत. याठिकाणी लोकसभेची जागा लढवण्यासाठी अजित पवार यांचे आमदार निलेश लंके हे इच्छुक आहेत. बंडखोरीच्या आणखी एक शक्यतेची जागा म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग…याठिकाणी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत इथून इच्छुक आहे. ही जागेवर शिंदे गटाचा दावा कायम असून ही जागा सोडण्यास ते तयार नाही पण भाजपकडून नारायण राणे यांना तिकीट दिलं जावू शकतं.