साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रूपांतर, कशी आहे मनोज जरांगे यांची तब्येत?
VIDEO | मनोज जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रूपांतर झालं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषणाचे काही टप्पे ठरवले आहेत. त्यापैकीच साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रूपांतर करणं हा एक टप्पा आहे.
जालना, २९ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सलग पाचव्या दिवशी सुरु आहे. मराठा आरक्षणावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी असल्याचे सांगितलंय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आजपासून गावागावात आमरण उपोषण सुरू झालं आहे. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रूपांतर झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार कायम आहे. तर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असल्याचे त्यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषणाचे काही टप्पे ठरवले आहेत. त्यापैकीच साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रूपांतर करणं हा एक टप्पा आहे.