महायुतीच्या खातेवाटपानंतर आता ‘मीच होणार पालकमंत्री’, ठाणे, पुणे, रायगड, संभाजीनगरचं पालकत्व कोणाकडे?
तब्बल २६ दिवसांनी खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी नेत्यांमध्ये दावेदारी रंगणार आहे. एकाच जिल्ह्यात अनेकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्यामुळे पालकमंत्री कोण होतो? याचीच चढाओढ रंगतेय
आधी मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपद कोणाला? त्यानंतर खातेवाटप कधी होणार आणि आता पालकमंत्री कोण होणार? यावरून काही मंत्र्यांनी दावे सुरू केले आहेत. एकाच जिल्ह्यात अनेकांना मंत्रिपद मिळाल्याने पालकमंत्रिपदावरून महायुतीतच रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल २६ दिवसांनी खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी नेत्यांमध्ये दावेदारी रंगणार आहे. एकाच जिल्ह्यात अनेकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्यामुळे पालकमंत्री कोण होतो? याचीच चढाओढ रंगतेय. रायगडचा पालकमंत्री मीच होणार म्हणून शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी दावा केलाय. तर नाशिकमधून अजित पवार यांच्या गटाचे नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून दादा भुसे मंत्री आहेत. यात पालकमंत्रिपदावर आपलाच दावा असल्याचे कोकाटे म्हणालेत. तर भुसेंनी पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळायला हवं, म्हणून आग्रह धरलाय. संभाजीनगरमध्ये भाजपकडून अतुल सावे आणि शिंदेंचे संजय शिरसाट मंत्री आहेत. यामध्ये पालकमंत्री आपणच होऊ, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट