NCP MLA Disqualified : राष्ट्रवादीच्या दावेदारीसाठी १२ दिवसांची लढाई, आमदार अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं
राष्ट्रवादी या पक्षाच्या चिन्हासह नावावर दावेदारी करण्यासाठी १२ दिवसांची लढाई होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रकही ठरलं आहे. यानुसार उद्यापासूनच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होणार कायदेशीर लढाईची सुनावणी
मुंबई, ५ जानेवारी २०२४ : अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. यानंतर राष्ट्रवादी नेमकी कुणाची अजित पवार की शरद पवार यांची? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. दरम्यान ही लढाई कायदेशीर मार्गावर येऊन पोहोचली असून आता राष्ट्रवादी या पक्षाच्या चिन्हासह नावावर दावेदारी करण्यासाठी १२ दिवसांची लढाई होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रकही ठरलं आहे. यानुसार उद्यापासूनच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तर २५ ते २७ जानेवारीदरम्यान या प्रकणावर अंतिम सुनावणी पार पडणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कुणाची याचा फैसला लागण्याची शक्यता आहे.
Published on: Jan 05, 2024 02:56 PM
Latest Videos