मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा चर्चा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार? की अजित दादांना बढती मिळणार?
VIDEO | मुख्यमंत्रिपदावरून फूल अँड फायनल, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार? की अजित दादांना बढती मिळणार? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, 4 ऑगस्च 2023 | एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री या पदावर विराजमान होऊन सव्वा वर्ष पूर्ण होत आहेत. पण अजित पवार हे आल्यापासून मुख्यमंत्रिपदावरून आधून-मधून चर्चा सुरू असते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. नंबर १, नंबर २ आणि नंबर ३ कोण हे सांगताना आता कोणताच बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदावरून फूल अँड फायनल झाल्याचे कळतेय. नवनिर्वाचित विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असे म्हणत आता कोणताच बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. याचाच अर्थ म्हणजे अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहणार आहेत, तसे देवेंद्र फडवणीस यांनी सभागृहात शिक्कामोर्तब केले आहे. बघा स्पेशल रिपोर्ट देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांनाच हिरो ठेवलं अन् अजित पवार यांचं कसं कौतुक केलं…