महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अमित शाह सोडवणार? दोन दिवसात होणार फैसला, कुणी काय केला दावा?

महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अमित शाह सोडवणार? दोन दिवसात होणार फैसला, कुणी काय केला दावा?

| Updated on: Mar 06, 2024 | 12:16 PM

भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपावर अमित शाह यांच्या उपस्थितीत अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे. म्हणजेच पुढच्या काही तासाच जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे पाहायला मिळणार आहे.

मुंबई, ६ मार्च २०२४ : महायुतीच्या जागावाटपावर मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असताना शिंदे गटाचा २२ जागांवर आणि अजित पवार गटाची १० ते १२ जागांची मागणी आहे. यासह १० जागांवर महायुतीतील दोन पक्षांचा दावा आहे. मात्र अमित शाह यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपावर अमित शाह यांच्या उपस्थितीत अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे. म्हणजेच पुढच्या काही तासाच जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या ४८ जागा आहे. २०१९ मध्ये यातील २५ जागांपैकी २३ जागा भाजपने युतीत जिंकल्या होत्या. आणि त्याच २३ जागांवर भाजपने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या जागा आम्ही सोडणार नाही असा दावाच केला. तर २०१९ मध्येच २२ जागांपैकी १८ जागा जिंकल्या त्यापैकी शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंसोबत १३ खासदार आलेत. २०१९ प्रमाणे २२ जागांची मागणी शिंदेंच्या शिवसेनेची आहे. तर अजित पवार गटाने १० ते १२ जागांची मागणी केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 06, 2024 12:16 PM