प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी? पहिल्या विस्तारात महायुतीनं काय-काय साधलं?

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी? पहिल्या विस्तारात महायुतीनं काय-काय साधलं?

| Updated on: Dec 16, 2024 | 10:30 AM

प्रचंड बहुमतानंतर महायुतीच्या बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झालाय. तिन्ही पक्षांमधून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कापला गेला. त्यात निम्म्या जणांनी पहिल्यांदाच मंत्रिपदीची शपथ घेतली.

महाराष्ट्र सरकारचा अखेर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री राज्याचा कारभार चालवणार आहेत. प्रचंड बहुमतानंतर महायुतीच्या बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झालाय. तिन्ही पक्षांमधून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कापला गेला. त्यात निम्म्या जणांनी पहिल्यांदाच मंत्रिपदीची शपथ घेतली. भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, गणेश नाईक, आशिष शेलार, जयकुमार रावल या नेत्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडली आहे. तर नितेश राणे, शिंवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर, मेघना बोर्डिकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके, जयकुमार गोरे यांचा नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालाय. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून यापूर्वी राहिलेल्या मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेतली. यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड आहेत. तर नव्या चेहऱ्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक आणि आशिष जैस्वाल यांना संधी देण्यात आलीये. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे या बड्या नेत्यांना पुन्हा मंत्री केलंय. तर नव्या चेहऱ्यांमध्ये नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, माणिकराव कोकाटे आणि इंद्रनिल नाईक यांचा समावेश आहे.

Published on: Dec 16, 2024 10:30 AM