Budget 2024 : मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय-काय फायद्याचं? बघा स्पेशल रिपोर्ट

Budget 2024 : मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय-काय फायद्याचं? बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Feb 02, 2024 | 10:32 AM

ऐन लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांआधी मोदी सरकारने दुसऱ्या टर्ममधील शेवटचं अंतरिम बजेट सादर केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ५७ मिनिटांच्या बजेट भाषणातून नोकरदारवर्गाची निराशा झालीये. कारण करमुक्त उत्पन्नाची मर्यादा जैसे थे ठेवण्यात आलीये.

मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : मोदी सरकारकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांआधी मोदी सरकारने दुसऱ्या टर्ममधील शेवटचं अंतरिम बजेट सादर केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ५७ मिनिटांच्या बजेट भाषणातून नोकरदारवर्गाची निराशा झालीये. कारण करमुक्त उत्पन्नाची मर्यादा जैसे थे ठेवण्यात आलीये. आयकरात सरकारने कोणताही बदल केलेला नाही. ७ लाख रूपये उत्पन्न असलेल्यांना कोणाताही कर नाही. २०२३ प्रमाणेच २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर द्यावा लागणार आहे. मात्र मोदी सरकारने कंपन्यांना या बजेटमधून दिलासा दिलाय. कार्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आणलाय. दरम्यान, फार मोठ्या घोषणा या बजेटमधून टाळण्यात आल्या मात्र या बजेटमध्ये सर्वसामान्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत काय काय आहे ? जाणून घ्या स्पेशल रिपोर्टमधून…

Published on: Feb 02, 2024 10:32 AM