कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान तिघांवर आचारसंहितेचा गुन्हा, बघा व्हिडीओ

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान तिघांवर आचारसंहितेचा गुन्हा, बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 27, 2023 | 6:49 PM

VIDEO | हेमंत रासने, रविंद्र धंगेकर आणि रूपाली पाटील ठोंबरे या तिघांवर का झाला गुन्हा दाखल, बघा व्हिडीओ

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान, भाजपचे उमेदवार हेमंत रासने, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबर यांच्याविरूद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाच्या निर्णय आधिकाऱ्यांनी कारवाई सुरू करत हेमंत रासने यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आला. तर रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करत असल्याचा आरोप करून उपोषण केले होते, त्यातून आचारसंहितेचा भंग त्यांनी केला होता. तर रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान करतानाचा फोटो व्हायरल करून मतदान गोपनीयतेचा भंग केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली होती.

Published on: Feb 27, 2023 06:49 PM