डोंबिवलीत भूकंपासारखा स्फोट, इमारतींना हादरे, काचा फुटून पडला खच अन् दुकानांचे उडाले शटर

डोंबिवलीत भूकंपासारखा स्फोट, इमारतींना हादरे, काचा फुटून पडला खच अन् दुकानांचे उडाले शटर

| Updated on: May 24, 2024 | 10:41 AM

गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारात अमुदान केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. यामुळे आग लागली. स्फोट झाल्यानंतर आवाज आणि हादरे असे बसले की लोक घाबरून पळायला लागले. आगीमुळे फक्त कंपनीत आग लागली नाहीतर आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या घराच्या काचा फुटल्यात

डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये काल गुरूवारी दुपारच्यावेळी बॉयलर स्फोट झाला. त्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचे हादरे दोन किलोमीटरपर्यंतच्या इमारतीच्या बिल्डिंगच्या काचा फुटल्या. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील तीन कंपन्यांना आग लागली. इतकंच नाहीतर हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दुपारी दीड वाजेच्या सुमारात अमुदान केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. यामुळे आग लागली. स्फोट झाल्यानंतर आवाज आणि हादरे असे बसले की लोक घाबरून पळायला लागले. आगीमुळे फक्त कंपनीत आग लागली नाहीतर आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या घराच्या काचा फुटल्यात आणि काचांचा खच पसरला. बघा डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील नागरिकांनी काय सांगितली आपबिती?

Published on: May 24, 2024 10:41 AM