Navi Mumbai | वाशी येथील एपीएमसी मार्केट परिसरातील एका इलेक्ट्रिक दुकानात आग
एपीएमसीमधील मर्चंट चेंबर या इमारतीमधील एका लाईटच्या दुकानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी वाशी अग्नीशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
एपीएमसीमधील मर्चंट चेंबर या इमारतीमधील एका लाईटच्या दुकानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी वाशी अग्नीशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविताना मोठे अडथळे येत आहेत. या इमारतीत जवळपास 250 दुकान असून आगीच्या धुरामुळे इतर लोकांनादेखील त्रास होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई येथई एपीएमसीमधईल मर्चंट चेंबर इमारतीतील एका इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली. अचानकपणे आग लागल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मर्चंट चेंबर या इमारतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. आग भडकल्यामुळे ही दुकानेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडण्याची शक्यता आहे.
Latest Videos