Special Report | कुवैतमध्ये भीषण अग्नितांडव, उपग्रहांनी टिपले काळ्या ढगांचे फोटो

Special Report | कुवैतमध्ये भीषण अग्नितांडव, उपग्रहांनी टिपले काळ्या ढगांचे फोटो

| Updated on: Aug 09, 2021 | 11:30 PM

कुवैतमधील सुलैबिया येथील जगातील सर्वात मोठ्या टायर कब्रस्तान परिसराला आग लागली आहे. गेले चार दिवस झाले ही आग धुमसतेय.

कुवैतमधील सुलैबिया येथील जगातील सर्वात मोठ्या टायर कब्रस्तान परिसराला आग लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून इथली आग धुमसतेय. जमिनीतील माती उपसून तयार केलेल्या मोठ्ठ्या खड्ड्यात सुमारे 70 लाख टायर आहेत. तब्बल सहा एकर इतक्या मोठ्या परिसरात हे कब्रस्तान पसरले आहे. या कब्रस्तानामध्ये भडकलेली आग इतकी प्रचंड आहे की, या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने निर्माण झालेल्या काळ्या ढगांची छायाचित्रे थेट उपग्रहांनी टिपली आहेत. (Fire at worlds biggest tyre graveyard in kuwait, black smoke seen from satellite)