BIG BREAKING : LTT रेल्वे स्थानकात आगीचा भडका, प्रवाशाची धावाधाव अन्…कशी लागली आग?
मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आग लागल्याची घटना. लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात बुकिंग आणि वेटिंग हॉलमध्ये ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला.
मुंबई, १३ डिसेंबर २०२३ : मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारच्या वेळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात बुकिंग आणि वेटिंग हॉलमध्ये ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. आग लागल्याचा व्हिडीओ पाहताना लक्षात येईल की या आगीचा भडका किती मोठ्या स्वरूपाचा होता. आगल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांची एकच धावाधाव झाल्याचे पाहायला मिळाले. आगीनंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर काढलं असून प्रवासी सुखरूप आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.