महाराष्ट्रातील ‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकर स्वतः कुठून लढणार?
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडत त्यांनी स्वतंत्र आघाडीची घोषणा केली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तर वंचितकडून 8 जागांचे उमेदवार जाहीर
महाविकास आघाडीपासून वेगळं होत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात वेगळं राजकीय वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडत त्यांनी स्वतंत्र आघाडीची घोषणा केली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तर वंचितकडून 8 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून वंचित राज्य कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीतून श्री. प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे अकोला येथून लढणार आहेत. त्यांनी स्वतःही घोषणा केली आहे. गेल्यावेळी देखील प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली होती. मात्र आता पुढची रणनिती काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.