मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, बघा काय म्हणाल्या

मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, बघा काय म्हणाल्या

| Updated on: Apr 04, 2023 | 5:10 PM

VIDEO | 'ठाण्यात मुख्यमंत्र्यांची दडपशाही सुरु असून आम्ही सुरक्षित नाही, श्वास घ्यायला त्रास होतोय…', रोशनी शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

ठाणे : शिंदे गटातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. ठाण्यातील कासारवडवली या भागात सदर प्रकार घडला. रोशनी शिंदे यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टीव्ही 9 शी बोलताना त्या म्हणाल्या, ‘ मी कुणालाही वैयक्तिक बोलले नाही. साहेबांची बायको नाचू शकते का, असं विचारलं होतं. कोणते साहेब वगैरे काही बोलले नव्हते. शिंदे गटाच्या महिला रात्री आल्या. त्यांनी मला मारहाण केली. माझ्या पोटात दुखतंय, त्रास होतोय….’, रोशनी शिंदे पुढे म्हणाल्या, ‘ त्या पोस्टमध्ये काही नव्हतं. पोस्ट राजकीय होती पण वैयक्तिक हल्ला करणं योग्य नाही. मी कुणाला उद्देशून बोलले नाही. मला धमक्यांचे कॉल येत होते. तेव्हा मी माफी मागितली. कुणाची भावना दुखावली गेली असेल तर सॉरी म्हटले दुपारी साडे ३ वाजता… तरीही संध्याकाळी मला मारहाण करण्यात आली. माझ्या पोटात मारलं.. याचं सीसीटीव्ही फुटेज असूनही पोलिसांनी त्यांना जाब विचारला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Published on: Apr 04, 2023 04:20 PM