मराठा आरक्षणावरून संभाजी भिडेंची पलटी, आधी पाठिंबा अन् आता मराठा म्हणजे….
मराठा म्हणजे वाघ आणि सिंह... आरक्षण कुठे घेऊन बसलात? असा सवाल संभाजी भिडे यांनी केला आहे. तर मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठून काढलं? असे वक्तव्य करत मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे यांनीच आता पलटी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं अशी भूमिका मांडली होती. पण आता संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावरून मांडलेल्या भूमिकेवरून युटर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, १२ सप्टेंबर २०२३ रोजी मनोज जरांगे पाटील यांची संभाजी भिडे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या उपोषणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला १०० टक्के यश येणार असे म्हटले होते. लवकरात लवकर यश येण्यासाठी या राजकारणी लोकांकडून पाहिजे तसं करून घेण्याची जबाबदारी मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर टाकावी, असे संभाजी भिडे यांनी म्हटले होते. या लढ्याचा शेवट मराठ्यांना आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचे भिडेंनी म्हटले होते.