हास्यविनोद, चर्चा अन् मिस्करी; भाजप, शिवसेना आणि एमआयएमचे नेते एकाच मंचावर
VIDEO | संभाजीनगरातील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच शिवसेना, ठाकरे गट, भाजप आणि एमआयएमचे नेते एकाच मंचावर अन् हास्यविनोदात रमले नेते
संभाजीनगर : संभाजीनगरातील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच शिवसेना, ठाकरे गट, भाजप आणि एमआयएमचे नेते एकाच मंचावर आले होते. हे नेते हास्यविनोदात रमल्याचे पाहायला मिळाले. घाटी रुग्णालयात अवयव दानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि एमआयएमचे नेते उपस्थित होते. या निमित्ताने हे नेते एकत्र आले होते. राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन, राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते आणि पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे एकाच मंचावर होते. यावेळी गिरीश महाजन आणि अंबादास दानवे यांच्या मध्ये इम्तियाज जलील बसले होते. पालकमंत्री संदीपान भुमरे एकाच सोफ्यावर दाटीवाटीने बसले होते. त्यांच्यात हास्यविनोद सुरू होता. यावेळी इम्तियाज जलील हे गिरीश महाजन यांच्या कानात काही तरी सांगता दिसत होते. बराचवेळ दोघांमध्ये स्टेजवरच चर्चा सुरू होती. दोघांमध्ये हास्यविनोद रंगला होता. त्यानंतर इम्तियाज जलील हे अंबादास दानवे यांच्या कानात काही तरी सांगताना दिसत होते.