मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार टँकरच्या खाली घुसली, काळ आता होता पण वेळ नाही

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार टँकरच्या खाली घुसली, काळ आता होता पण वेळ नाही

| Updated on: Jan 02, 2022 | 6:40 PM

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला असून एका भरधाव सिलिरिओने टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार मधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

रायगड : मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर एक भीषण अपघात झाला आहे. सिलिरिओ कारने टँकरला पाठिमागून धडक दिली आहे. या भीषण अपघातात कार टँकरच्या खाली घुसली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.