मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जंगी तयारी

मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जंगी तयारी

| Updated on: Mar 11, 2022 | 11:40 AM

गोवा राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. गोव्यात भाजपाने चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात भाजपाने दणदणित यश मिळवले आहे. पंजाब वगळता चारही राज्यात भाजपाने बाजी मारली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोवा राज्याचे प्रभावी होते. गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. गोव्यात भाजपाने चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.