मुंबईत राज्यपालांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन, देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन, देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्यांदाच ध्वजारोहण केले. मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. छत्रपती शिवाजी पार्कवर राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्ली सजली आहे. इंडिया गेट आणि संसद भवनावर तिरंगा रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. तर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, विधिमंडळ, राज्यभवन आणि सीएसएमटी इमारतींना तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर आज दिल्लीतील कर्तव्यपथावरून तिन्ही दलाच्या कवायतींसह भारताच्या विविधता आणि एकतेचे रथेच्या माध्यमातून जगाला भारताची ताकद दिसणार आहे.