सोयाबीन अन् कापसाची शेती वाहून गेल्यानं अमरावतीच्या शेतकऱ्याचा आक्रोश; व्हिडीओ व्हायरल

सोयाबीन अन् कापसाची शेती वाहून गेल्यानं अमरावतीच्या शेतकऱ्याचा आक्रोश; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 29, 2023 | 9:59 AM

VIDEO | अमरावतीत ढगफुटी सदृश्य पाऊस, चिंचपूर येथील शेतकऱ्याची सगळी शेती वाहून गेल्यानं आक्रोश, व्हिडीओ होतोय व्हायरल

अमरावती, 29 जुलै 2023 | मागील आठ दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे बळीराजाच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांना अक्षरशः जलसमाधी मिळाली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचपूर येथे मोठा महापूर आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे चिंचपूर येथील शेतकरी विलास धारणे यांच्या शेतातून हा महापूर गेल्याने सोयाबीन, कापूस पावसाच्या पुराच्या पाण्याखाली वाहून गेली आहे. हाता तोंडाशी आलेले पीक भर पावसात वाहून गेल्यानं त्यांनी आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याच चिंतातूर शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठा व्हायरल होत आहे.

Published on: Jul 29, 2023 09:59 AM