VIDEO : शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने जयंतीचा मोठा सोहळा आयोजित केला होता. या दिमाखदार सोहळ्याला हजारो मनसैनिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. यावेळी हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने जयंतीचा मोठा सोहळा आयोजित केला होता. या दिमाखदार सोहळ्याला हजारो मनसैनिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. यावेळी हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व मनसैनिकांना शपथ दिली. मनसेने आज शिवाजी पार्कवर तिथीप्रमाणे शिवजयंती सोहळ्याचं आयोजन केलं आहे. या सोहळ्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. या निमित्ताने शिवाजी पार्क परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधले होते. काही मनसे कार्यकर्ते तर भगवे कपडे परिधान करून आले होते.
Latest Videos