दाटले रेशमी धुके... मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर; परशुराम घाटात वाहतूक मंदावली

दाटले रेशमी धुके… मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर; परशुराम घाटात वाहतूक मंदावली

| Updated on: Dec 22, 2024 | 1:03 PM

परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दाट धुकं असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

मुंबई गोवा महामार्गावर धुक्याची दाट चादर पसल्याचे पाहायला मिळत आहे. परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दाट धुकं असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सावर्डे कामथे घाट -परशुराम घाट या भागात मोठ्या प्रमाणात धुके पसरलंय. सततच्या वातावरणातील बदलांमुळे धुके वाढले आहे. परशुराम घाटही धुक्यात हरवला असल्याने वाहन चालकांचा धुक्यातून रस्ता शोधत प्रवास करावा लागतोय. मागील दोन दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आहे तर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुके पसरले आहे परशुराम घाटही धुक्यात हरवला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वातावरण अल्हाददायक असल्याचे पाहायला मिळाले असले तरी वाहन चालकांना धुक्यातून संत गतीने वाहतूक करावी लागत आहे. बघा कसं आहे मुंबई-गोवा महामार्गावर वातावरण?

Published on: Dec 22, 2024 01:03 PM