उलट्या, मळमळ अन्... संत बाळूमामा यांच्या कार्यक्रमात हजारो लोकांना विषबाधा

उलट्या, मळमळ अन्… संत बाळूमामा यांच्या कार्यक्रमात हजारो लोकांना विषबाधा

| Updated on: Feb 07, 2024 | 2:00 PM

लोहा तालुक्यातील कोस्टवाडी येथे काल संत बाळूमामा यांचा धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात कोष्टवाडी ,सावरगाव ,हरणवाडी ,पेंडु ,सादलापुर या गावासह परिसरातील जवळपास 1 हजार लोकांना जेवणातील भगर खाल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे

नांदेड, ७ फेब्रुवारी २०२४ : नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळाकोळी हद्दीतील कोस्टस्टवाडी येथे संत बाळूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजर करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकांनी भगर खाल्ल्यामुळे जवळपास 1 हजार लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. लोहा तालुक्यातील कोस्टवाडी येथे काल संत बाळूमामा यांचा धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात कोष्टवाडी ,सावरगाव ,हरणवाडी ,पेंडु ,सादलापुर या गावासह परिसरातील जवळपास 1 हजार लोकांना जेवणातील भगर खाल्यामुळे विषबाधा झाली आहे. भगर खाल्यामुळे सर्वांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. सर्व रुग्णांना उपचारासाठी नांदेड जिल्हा रुग्णालय , लोहा ग्रामीण रुग्णालयसह विविध रुग्णालयात दाखल केले असून निम्म्या रुग्णांवर उपचार करून घरी पाठवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Published on: Feb 07, 2024 02:00 PM