जेवणाचे मोठाले टोप, भाज्या निवडण्याची लगबग, जरांगेंसह मराठ्यांसाठी APMC मध्ये भरपेट जेवण्याची सोय
आज नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चा हा नवी मुंबईमध्ये प्रवेश करणार आहे.नवी मुंबई एपीएमसी मार्केट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी येणार आहे .त्यासाठी एपीएमसी मार्केट च्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली आहे.
नवी मुंबई, २५ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठ्यांचा पायी मोर्चा अवघ्या काही तासात मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे. आज नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चा हा नवी मुंबईमध्ये प्रवेश करणार आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी येणार आहे .त्यासाठी एपीएमसी मार्केट च्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली आहे. सकाळपासूनच या ठिकाणी जेवण बनवण्यास सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. लाखो मराठ्यांच्या जेवणाबरोबर सकाळ आणि संध्याकाळच्या न्याहारीची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर चहा आणि पाण्याची देखील सोय जागोजागी करण्यात आलेली आहे. जेवणामध्ये भाजी, चपाती, भाकरी बरोबर ठेचा, भात आणि गोड शिरा देखील या मोर्चेकरांसाठी ठेवण्यात आलेला आहे. कोणालाही उपाशी पोटी जाता येणार नाही अशा प्रकारच्या जेवणाची सुविधा या ठिकाणी करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे