माझा जीव गेल्यावर सरकार राहिल का? मनोज जरांगे पाटलांचा सवाल अन् सगेसोयऱ्यांच्या कायद्यावर ठाम
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत असल्याने अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांची चिंता आता वाढली आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीला बीड जिल्ह्यातील नारायण गड संस्थानचे महंत मठाधिपती शिवाजी महाराज आले होते. त्यांनी जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली. पण त्यांनी ऐकले नाही
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण अंतरवाली सराटी येथे सुरू आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती चांगलीच खालावली. त्यांच्या रक्तातून रक्तस्त्राव होत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. तर अशा स्थितीत त्यांनी पुन्हा मुंबईला येण्याचा इशारा सरकारला दिला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत असल्याने अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांची चिंता आता वाढली आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीला बीड जिल्ह्यातील नारायण गड संस्थानचे महंत मठाधिपती शिवाजी महाराज आले होते. त्यांनी जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली. पण त्यांनी ऐकले नाही. जरांगे झोपलेले असताना आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना सलाईन लावलं. मात्र ते त्यांनी काढून फेकलं. सगेसोयऱ्यांच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. जी अधिसूचना राज्य सरकारने काढली त्यावरून कायदा करा अशी मागणी जरांगेंची आहे. यावरून जरांगे पाटील यांनी सरकारवर काय केली टीका?