असं कोणतं कारण आहे की मुख्यमंत्र्यांना भेटणार तुरूंगातून सुटलेले माजी गृहमंत्री
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात होणाऱ्या पोलीस भरती संदर्भांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( dcm devendra fadnvis ) यांनी महाविकास आघाडी ( mahavikas aghadi ) सरकारने मला तुरुंगात पाठविण्याची पूर्ण तयारी केली होती असा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( anil deshmukh ) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस जे काही बोलले आहेत त्यावेळी मी गृहमंत्री नव्हतो. त्याबद्दल मला काहीही माहित नाही असे त्यांनी सांगितले आहे.
मुंबईसह राज्यात पोलीस भरती सुरु झाली आहे. ११ हजार पोलिसांची भरती होणार आहे. पण, मी गृहमंत्री असताना राज्यात तीन टप्प्यात पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात १२ हजार, दुसऱ्या टप्प्यात १२ हजार आणि तिसऱ्या टप्प्यात ८ हजार अशी भरती करण्यात येणार होती. तीच कार्यपद्धती या सरकारने राबविल्यास राजयातील तरुण मुलामुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे अनिल देशमुख म्हणाले. तसेच, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे असेही ते म्हणाले.