Nagpur | महिन्याभरापासून चर्चा मगरीची! वन विभागाचं मिशन मगर; नाग नदीत लावले पिंजरे, ट्रॅप कॅमेरे

Nagpur | महिन्याभरापासून चर्चा मगरीची! वन विभागाचं मिशन मगर; नाग नदीत लावले पिंजरे, ट्रॅप कॅमेरे

| Updated on: Dec 22, 2021 | 5:55 PM

मगरीला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत. शिवाय कॅमेरा ट्रॅपही बसवण्यात आलाय, अशी माहिती वन विभागाचे महेशकुमार बोरकर यांनी दिली.

नागपूर : शहराच्या मध्यभागी नाग नदीत मगरीचं वास्तव्य आहे. शहराच्या मध्यभागी मगर आढळल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळं मगरीला पकडण्यासाठी वन विभागाने मिशन मगर सुरु केलंय. महाराजबाग परिसरात वन विभागाचे कर्मचारी 24 तास तैनात असतात. याच परिसरात मगरीला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत. शिवाय कॅमेरा ट्रॅपही बसवण्यात आलाय, अशी माहिती वन विभागाचे महेशकुमार बोरकर यांनी दिली.