शेतात ‘या’ पक्ष्याचं घरटं दाखवा अन् 10 हजार रूपये मिळवा; राज्य सरकारनं काय घेतला मोठा निर्णय?
VIDEO | सुप्रीम कोर्टाने 'या' पक्षाच्या संवर्धनासाठी 62 कोटींचा प्रकल्प उभारण्याचे दिले आदेश
गोंदिया : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या शेतात सारस पक्षाचे घरटे आहेत. मग तुम्हाला मिळणार 10 हजार रूपये हे खर आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सारस पक्षी संवर्धन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 62 कोटीचा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे. यात ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्षांचे घरटे आहेत असा शेतकऱ्यांना 10 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. दिवसेंदिवस सारस पक्षांच्या संख्येत घट होत आहे. सारस पक्षी हा जोडीने राहत असतो, एक जोडीदार मृत झाला की दुसरा पक्षी सुध्दा मृत होतो. प्रेमाचं प्रतीक म्हणून सारस पक्षी ओळखला जातो. सारस पक्षांचा अधिवास गोंदिया भंडारा जिल्ह्यातील शेतात आढळून येतं आहेत. त्यामुळे सारस पक्षाच्या संख्येत वाढ व्हावा यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. शेतात सारस पक्षांचे घरटे असल्यास शेतकऱ्यांना 10 हजार रूपये आर्थिक मदत मिळणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं आहे. सुप्रीम कोर्टाने सारस संवर्धनासाठी 62 कोटींचा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहेत.