जरांगेंचा पहिला उमेदवार ठरला? भाजपच्या खतगावकरांना संधी? बघा कसा आहे निवडणुकीचा प्लॅन?

जरांगेंचा पहिला उमेदवार ठरला? भाजपच्या खतगावकरांना संधी? बघा कसा आहे निवडणुकीचा प्लॅन?

| Updated on: Aug 15, 2024 | 11:33 AM

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आणि त्यांचा पहिला उमेदवार ठरल्याचीही चर्चा आहे. भाजपच्या मिनल खतगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि नायगाव मतदारसंघातून पाठिंब्याची मागणी केली.

भाजपचे माजी खासदार भास्कर खतगावकर यांच्या सून मिनल खतगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि विधानसभा निवडणूक मतदारसंघातून पाठिंबा देण्यची मागणी केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. मिनल खतगावकर भाजपच्या माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सून आहेत. मिनल खतगावकर नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत. २०१९ मध्ये विधानसभेला आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. मात्र दोन्ही वेळेला त्यांना पक्षाच्या आदेशानंतर माघार घ्यावी लागली. काही महिन्यापूर्वी मिनल खतगावकर यांनी अमित शाहांची भेट घेतली होती. येत्या २९ तारखेला निर्णय घोषित करणार आहेत. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. तर धुळे सोलापूर महामार्गावर पैठण फाटा या ठिकाणी जरांगेंचं नवं संपर्क कार्यालय सुरू होतंय. याच ठिकाणी रणनिती ठरवली जाणार आहे.

Published on: Aug 15, 2024 11:33 AM