उत्तर भारतीयांचा मेळावा रद्द करत उद्धव ठाकरे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करणार इर्शाळवाडीचा दौरा
येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य आज चौथ्या दिवशी देखील सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आणि बचावकार्याचा आढावा घेतला.
मुंबई | 22 जुलै 2023 : मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली. येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य आज चौथ्या दिवशी देखील सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आणि बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांनी यासंदर्भात निवेदन सादर करत इर्शाळवाडितील नागरिकांचे कायमस्वरूपी पुर्नवसन केले जाईल असे म्हटलं आहे. तर याच दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज इर्शाळवाडीला भेट देणार आहेत. ते येथील दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट देणार आहेत. पंचायत मंदिरात बचावलेल्या ग्रामस्थांशी ते संवाद साधणार असून नंतर ते इर्शाळवाडीच्या दुर्घटनाग्रस्त वाडीच्या पायथ्याला जाऊन मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतील. तर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असून ते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठीच गेल्याची चर्चा रंगली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर असणार आहेत. अहेरी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे उद्घाटन समारंभात उपस्थित राहणार आहेत.