माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; काय आहे कारण?

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; काय आहे कारण?

| Updated on: May 23, 2023 | 2:03 PM

VIDEO | मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली, हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री उशिरा त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनोहर जोशी यांच्यावर डॉक्टर चारूलता संकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे. सोमवारी रात्री मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेंदूत रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडले आहेत. दरम्यान, मनोहर जोशी यांचं वय ८६ वर्षांचं आहे. मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली होती.

Published on: May 23, 2023 01:59 PM