‘नाव बदलायला निवडणूक आयोग शिवसेनेची आत्या लागत नाहीये’; उद्धव ठाकरे यांनी फटकारलं
VIDEO | 'खुर्चीच्या मोहापायी त्या खुर्चीखाली जनता चिरडली तर जात नाही ना? एवढंच बघा', उद्धव ठाकरे यांनी सुनावलं
मुंबई : जिथे शिवसेना प्रमुख आणि ठाकरे आहेत तीच खरी शिवसेना असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा भाष्य केले. आमचा पक्ष इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. उद्या मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचं नाव बदललं तर? निवडणूक आयोगाने शिवसेनेचं बारसं केलं नव्हतं. कानात येऊन नाव सांगायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या लागत नाहीये. ते नाव खणखणीतपणाने माझ्या आजोबांनी दिलंय. ते शिवसेना प्रमुखांनी घेतलं. म्हणून तर त्यांना शिवसेनाप्रमुख म्हणतात. त्यामुळे कोणी असे उठले आणि शिवसेना प्रमुख व्हायला लागले तर लोक जोड्यानं मारतील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाही फटकारल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या आणि दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.