Vishwajeet Kadam यांच्याकडून सरकारला थेट विचारणा; म्हणाले, ‘आरक्षणप्रश्नी फसवी आश्वासने…’
VIDEO | मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, सरकारने केवळ फसवी आश्वासन जाहीर करू नये, काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
सांगली, ९ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सरकार आणि मराठा-कुणबी समाज यांच्यात खटके उडताना दिसत आहे. मराठा आणि धनगर आरक्षणाप्रश्नी सत्ताधाऱ्यांनी फसवणूक केल्याची भावना निर्माण झालेली आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. सरकारने केवळ फसवी आश्वासन जाहीर करू नये, अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. तर मराठा आणि धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची कायम आहे. तसेच काँग्रेस हे मराठा आणि धनगर समाजाच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला आहे. राज्यातील मराठा आणि धनगर आरक्षणबाबतीत सांगलीत आमदार कदम बोलत होते. यावेळी विश्वजित कदम यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?

नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'

औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
