ठाकरे गटाच्या कार्यकर्तीची पत्राद्वारे गृहमंत्री, पोलीस आयुक्तांकडे तक्रार; काय आहे प्रकरण?
VIDEO | ठाण्यात राजकीय वातावरण कोणत्या दिशेने? शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविकेकडून धमकी, ठाकरे गटाच्या कार्यकर्तीचा गंभीर आरोप
ठाणे : ठाण्यात महिलांना धमकीचे सत्र सुरू माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी ठाकरे गटाच्या युवतीसेना पदाधिकारी तरूणीस फोनवरून धमकी दिल्याचाप्रकार समोर आला आहे. कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राच्या युवतीसेना अध्यक्षा स्मिता आंग्रे यांनी शिवसेना ठाकरे गटातील अमित परब यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नम्रपणे विकास दरवळतोय अशी कमेंट केल्यानंतर बुधवारी रात्री 11 वाजता शिंदे गटाच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी स्मिता नारायण आंग्रे यांना फोन करून धमकावित रोशनी शिंदे ची काय हालत झाली तशी तुझी होईल अशी धमकी दिली. यानंतर स्मिता नारायण आंग्रे यांनी गुरुवारी श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेली असता तेथे तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. यानंतर स्मिता आंग्रे यांनी एका पत्राद्वारे गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रारही दाखल केली. तर दुसरीकडे नम्रता भोसले जाधव यांनी पोलीस आयुक्तांकडे स्मिता आंग्रेविरोधात पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.