त्यावेळी मला बिचाऱ्या आदित्य ठाकरे यांची दया आली, भगतसिंह कोश्यारी असं का म्हणाले?

त्यावेळी मला बिचाऱ्या आदित्य ठाकरे यांची दया आली, भगतसिंह कोश्यारी असं का म्हणाले?

| Updated on: Feb 21, 2023 | 3:32 PM

VIDEO | पहाटेच्या शपथविधीबद्दल माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले? बघा व्हिडीओ

उत्तराखंड : पहाटेच्या शपथविधीवर बोलताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मौन सोडले आहे. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी अजित पवार माझ्याकडे लिस्ट घेऊन आले होते. त्यावर सही होती, आणि ते म्हणाले फडणवीसाचं आम्ही समर्थन करतो. मी म्हंटलं चांगली गोष्ट आहे, त्यानंतर काही लोकं कोर्टात गेले आणि कोर्टाने निर्णय दिला की लवकर बहुमत सिद्ध करा, मी त्यांना म्हणालो घटनेत दिलेल्या निर्देशानुसार बहुमत सिद्ध करा. त्यामुळे मीही म्हटलं तुम्ही शपथ घ्या, बहुमत सिद्ध करा, यामध्ये माझं काय चुकलं? कोणी संविधान तज्ज्ञ असेल तर त्यांनी यामध्ये माझं काय चुकलंय ते सांगावं असा सवालही कोश्यारी यांनी उपस्थित केला. यादरम्यान, महाविकास आघाडीला वेळ दिला नाही असे असेही म्हटले जात होते. यावर बोलताना कोश्यारी म्हणाले, माझ्याकडे लोकं आले मी त्यांना सांगितलं माझ्याकडे चिठ्ठी घेऊन या, पण त्यांची चिठ्ठी आली नाही, बिचाऱ्या आदित्यवर मला दया आली, १० वेळा तो आत-बाहेर गेला पण त्यांची चिठ्ठी आली नाही, त्यांच्याकडे चिठ्ठी नव्हती त्यात मी कसा दोषी असणार, असाही सवालही त्यांनी उपस्थित केला.