महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्त होणार? काय केली मोठी घोषणा?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्त होणार? काय केली मोठी घोषणा?

| Updated on: Oct 25, 2023 | 10:36 PM

VIDEO | माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी काल राज्याच्या राजकारणातून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी अखेर माघार घेतली. यानंतर आता महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनीदेखील मोठी घोषणा केलीय.

सोलापूर, २५ ऑक्टोबर २०२३ | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी थेट राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. यावरून एकच चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्टीकरणही दिलं आहे. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी निवडणुकांमधून निवृत्ती घेत आहे. मात्र पक्षाचे काम करतच राहणार आहे, असं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. “मी आता 83 वर्षांचा झालो आहे. त्यामुळे पूर्वीसारखी काम होत नाही, धावपळ करणे होत नाही. त्यामुळे मला शक्य होईल तेवेढे काम करणार आहे. मी निवडणुकांमधून निवृत्ती घेतोय. मात्र पक्ष संघटनेचे काम मी करतच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय.

Published on: Oct 25, 2023 10:36 PM