किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा; काय आहे प्रकरण?
VIDEO | माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, तूर्तास आरोपपत्र दाखल न करण्याचे पोलिसांनी निर्देश, बघा काय आहे प्रकरण?
मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा देण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाकडून कथित एसआरए घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर कोणतेही आरोप पत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. येत्या ३० मार्चपर्यंत किशोरी पेडणेकर यांची मुंबई हायकोर्टातील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
Published on: Feb 21, 2023 05:07 PM
Latest Videos