मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास

| Updated on: May 09, 2023 | 8:04 AM

VIDEO | मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन, काय आहे कारण? काय होती त्यांची ओळख

मुंबई : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र रूग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वनाथ महाडेश्वर यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख होती. २००२ साली पहिल्यांदा मुंबई महानगर पालिकेवर नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली होती. २००२ पासून २०१७ पर्यंत सलग ४ वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर २००३ मध्ये विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. २०१७ ते २०१९ मध्ये त्यांनी मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळली. २०१९ मध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वनाथ महाडेश्वर हे कायम होते.

Published on: May 09, 2023 07:30 AM