योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश, पक्षप्रवेशाबाबत नेमकं काय म्हणाले?
VIDEO | अजित पवार गटाचा शरद पवार गटाला धक्का, अजित पवार यांच्या गटात आणखी एका ‘पुतण्या’ची एन्ट्री, जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटात प्रवेश
मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | बीडमधील माजी नगरसेवक योगेश क्षीरसागर यांचा आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश होतोय. यावर माध्यमांशी बोलताना योगेश क्षीरसागर म्हणाले, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. माझ्यासोबत जवळपास आजी माजी असे 35 नगरसेवक पक्षप्रवेश करणार आहेत. मी आधी काँग्रेसमध्येही होतो त्यानंतर राष्ट्रवादीतही होतो मधल्या काळात राष्ट्रावादीशी संपर्क तुटला होता आज पुन्हा तो जोडला जातोय, अशी प्रतिक्रिया योगेश क्षीरसागर यांनी दिली. तर कोणी कोणावर काय टीका केली त्यापेक्षा टीका करताना आपली लायकी काय हे तपासावं. जे लोकप्रतिनिधी टीका करतायत त्यांनी काम काय केलय तेही तपासावं. परवा जी सभा झाली त्याच विकासाचं भाषण कोणीच केलं नाही विकासाचं उल्लेख नाही. म्हणून 27 तारखेला आम्ही विकासासाठी सभा घेतोय. अजितदादा आणि इतर सर्व नेते त्या सभेला असतील परवाच्या सभेपेक्षा 10 पट गर्दीने विराट सभा पार पडेल, असा विश्वासही योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो

वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार

मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी..
