एका चहावाल्यानं देश बिघडवला, तुम्ही सभेत अडचण नका आणू; माजी मंत्र्याची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

एका चहावाल्यानं देश बिघडवला, तुम्ही सभेत अडचण नका आणू; माजी मंत्र्याची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

| Updated on: Feb 05, 2023 | 12:25 PM

कोणत्या माजी मंत्र्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली बोचरी टीका? आणि कुठे साधला निशाणा?

बुलढाणा : एका चहा वाल्याने देश बिघडवला तुम्ही आमची सभा बिघडवू नका, असे म्हणत माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी देशाचे पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भर सभेत बोलत असताना राजेंद्र शिंगणे यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमादरम्यान राजेंद्र शिंगणे यांचे भाषण सुरू असतानाच एका चहा वाल्याने कार्यकर्त्यांना चहा द्यायला सुरुवात केली, दरम्यान या चहावाल्याला टोला लगावत राजेंद्र शिंगणे यांनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली आहे.

Published on: Feb 05, 2023 12:24 PM