Sadabhau Khot on BJP : मला मंत्री करा अन्यथा... सदाभाऊ खोत यांचा भाजपला सूचक इशारा

Sadabhau Khot on BJP : मला मंत्री करा अन्यथा… सदाभाऊ खोत यांचा भाजपला सूचक इशारा

| Updated on: Jun 11, 2024 | 4:40 PM

गावाकडच्या नेतृत्व करणाऱ्या घटक पक्षांचे प्रतिबिंब मंत्रिमंडळात विस्तारात उमटलं पाहिजे आणि घटक पक्षांना सन्मान दिला पाहिजे, अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये नाराजीची भावना पसरेल, असं सूचक इशारा सदाभाऊ खोत यांनी भाजपाला दिला आहे.

नुकतीन नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तर या मोदी 3.0 कॅबिनेटचं अधिकृतपणे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदींच्या कॅबिनेटच्या शपथविधीला एक दिवस होत नाही तर काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या, अशी मागणी रयत क्रांती संघटनेची माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. गावाकडच्या नेतृत्व करणाऱ्या घटक पक्षांचे प्रतिबिंब मंत्रिमंडळात विस्तारात उमटलं पाहिजे आणि घटक पक्षांना सन्मान दिला पाहिजे, अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये नाराजीची भावना पसरेल, असं सूचक इशारा सदाभाऊ खोत यांनी भाजपाला दिला आहे. तसेच आयाराम-गयारामांचे लाड किती पुरवावे, याला निर्बंध असणे गरजेचे आहे, असा सल्ला देखील सदाभाऊ खोत यांनी भाजपाला दिला आहे.

Published on: Jun 11, 2024 04:40 PM