Sanjay Rathod Case | महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी संजय राठोडांना क्लीनचीट

Sanjay Rathod Case | महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी संजय राठोडांना क्लीनचीट

| Updated on: Aug 21, 2021 | 8:53 PM

राज्याचे माजी वनमंत्री मंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला होता.

राज्याचे माजी वनमंत्री मंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांकडून क्लीनचीट मिळाली आहे. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात नमुद केलेल्या महिलेची नाही. महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजीमंत्री व आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठविलेला नाही. या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे, असं यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितलं आहे.

Published on: Aug 21, 2021 08:51 PM